महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार
मुंबई : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारनंतर राज्य सरकारने 30 जूनपर्यंत (Maharashtra Lockdown 5 guidelines) वाढवला आहे. नुकतंच महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये बरीचशी सूट देण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Mission Begin Again)
राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता जनजीवन सुरु करण्यात येणार आहे. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
मात्र राज्यातील धार्मिक स्थळेही, हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट बंदच राहणार आहे. तसेच सामूहिक कार्यक्रमांनाही बंदी असणार आहे. (Maharashtra Mission Begin Again)
नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?
-3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक
-कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार
-सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना परवानगी
-सार्वजनिक मैदानेही खुली होणार
-समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी
-धार्मिक स्थळं बंदच राहणार
-स्टेडिअम मात्र बंदच राहणार
-फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश
-लांबच्या प्रवासावर बंदी
-शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार
-मेट्रो बंदच राहणार
-आंतरराज्य प्रवासाला परवानगी नाही
कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार
राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. (Maharashtra Lockdown 5 guidelines)
पहिला टप्पा – 3 जून
दुसरा टप्पा – 5 जून
तिसरा टप्पा – 8 जून
पहिल्या टप्प्यात ‘या’ गोष्टींना परवानगी
पहिला टप्पा – येत्या 3 जूनपासून पहिला टप्पा सुरु होईल. यात सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही
सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी
सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते,
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत
सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ‘या’ गोष्टी शिथील होणार
दुसरा टप्पा – येत्या 5 जूनपासून दुसरा टप्पा सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.
१. ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही
२. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी
३. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2
दुचाकी – केवळ चालक
तिसरा टप्पा – येत्या 8 जून पासून तिसरा टप्पा सुरु होईल. या टप्प्यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे.
नाईट कर्फ्यू
संपूर्ण महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहील. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असेल.
65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे.
कोरोना रुग्णांची संख्येनुसार जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाने कंटेन्मेंट झोन घोषित करावेत. हा कंटेन्मेंट झोन हा एकदा परिसर, नगर, इमारत, झोपडपट्टी किंवा शहरात घोषित केला जावू शकतो. या भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वया भागातील कायदेशीरपणे कडक कारवाई करण्यात येईल.
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे
चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे
पाचवा लॉकडाऊन – 1 जून ते 30 जून
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका
पहिली बैठक – 20 मार्च
दुसरी बैठक – 2 एप्रिल
दुसरी बैठक – 11 एप्रिल
तिसरी बैठक – 27 एप्रिल
पाचवी बैठक – 11 मे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात (Maharashtra Lockdown 5 guidelines) आला.
महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2zDa660
via
No comments