Breaking News

पीपीई किट्‌स होतील आता स्टरलाईज!

Nagpur Today : Nagpur News

संशोधनानंतर हिरवा कंदिल : खा. डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या उपचारादरम्यान येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पीपीई किट्‌सची आहे. रुग्णावर उपचार करताना डॉक्टर्स आणि परिचारिकांना ह्या किटचा वापरा करावा लागतो. १० ते १२ तास वापरल्यानंतर ती सरळ कचरापेटीमध्ये टाकावी लागते. एका किटकरिता १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. या समस्येवर खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपाय शोधून काढला असून स्टरलाईज होणाऱ्या पीपीई किट्‌स आता उपलब्ध होऊ शकतील. त्याच्या संशोधनाला हिरवा कंदील मिळाला असून कायदेशीर पूर्ततेनंतर या किट्‌स वापरता येतील.

पीपीई किट्‌स उपलब्धतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी डॉ. खा. विकास महात्मे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी एक चांगलं व वेगळ्या प्रकारचे निदान दिले आहे. ‘मास्टर टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे मोनीश भंडारी यांच्यासोबत डॉ. विकास महात्मे यांचा संपर्क झाला तेव्हा डॉ. महात्मे यांना मनीष भंडारी यांनी टेक्नॉलॉजीबाबत माहिती दिली. मोनीश भंडारी हे सन २०१३ पासून ही कंपनी चालवत आहेत. त्यांनी मिनिस्टरी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर घेतली होती, जी म्हणजे ‘मायक्रोवेव डीसिन्फेक्टांट सिस्टिम’. ज्यामुळे साधारणतः हॉस्पिटल मध्ये लागणारे लिनन किंवा तत्सम मटेरियल हे स्टेबलाइज होतात. सध्याचे युनीट हे बहुतांश एम्स आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लागलेले आहेत.

त्यामध्ये फक्त काही सायकल्स बदलवून पीपीई (PPE) किट्सपण स्टरलाईज होऊ शकतात. डॉ. महात्मे यांनी पुढाकार घेऊन जोधपूर येथील एम्समधील डीन यांच्याशी संपर्क साधून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यासाठी विनंती केली. जोधपूर एम्सकडून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यात आली त्यानंतर टेस्टिंग देखील करण्यात आली आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि जोधपूरच्या एम्सने या सर्व चाचण्या केल्यानंतर या टेक्नॉलॉजीला हिरवा कंदील दिला.

म्हणजेच आता या किटला आपण स्टारलाईज करून पुन्हा वापरू शकतो. लवकरच या टेक्नॉलॉजीची ज्याकाही कायदेशीर परवानगी सरकारकडून घ्यायची असेल त्या डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनात मोनिश भंडारी पूर्ण करतील. यामुळे प्रती मशीन २ लाख ४० हजार बचत होणार असून सध्या देशामध्ये ६० च्या वर मशीन्स कार्यरत आहेत. संपूर्ण देशामध्ये जो पीपीई किट्सचा तुटवडा निर्माण झालेला आहे तो ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने पूर्ण होऊ शकेल. हे देशासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या संकटसमयी डॉ. विकास महात्मे यांनी घेतलेला पुढाकार आणि मोनीश भंडारी यांचे प्रयत्न हे आपल्या सर्वांसाठी व देशासाठी फायद्याचे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे.

पीपीई किट्‌स होतील आता स्टरलाईज!



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/35rDRCh
via

No comments