Breaking News

कुली, ऑटोचालकांसह कामगार संकटात

Nagpur Today : Nagpur News

– कसे जगणार आणि जगविणार ?

नागपूर– नागपूर रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या जगणाèयांची संख्या प्रचंड मोठी आहे. काही नियमानुसार तर कोणी नियमाबाह्य पद्धतीने, पण रेल्वेच्या साह्याने जगत होते अन् कुटुंबालाही जगवत होते. आता मात्र, रेल्वे स्थानकच लॉक डाऊन झाल्याने त्यावर निर्भर असलेल्या शेकडो कामगारांवर उपासमारीची पाळी आली. विशेष म्हणजे अधिकृतरीत्या असलेले १५२ कुली बांधव आणि अधिकृत नसले तरी अनेक अनेक दशकांपासून प्रवाशांना सेवा देणारे शंभराच्यावर ऑटोचालक यांच्यासह असंघटित कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. कोरोनापासून वाचले तर उपासमारी नेम धरून आहे. त्यामुळे कसे जगणार आणि कुटुंबाला कसे जगविणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लॉक डाऊन हाच एकमेव उपाय असल्याने आता अख्खा देश थांबला आहे. त्यामुळे सारेच आपआपल्या घरात आहेत. पण खातील काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. आधी आठवडाभर म्हणजे ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद होती. तोपर्यंत ठीक होते आता मात्र, १४ एप्रिलपर्यंत म्हणजे पुन्हा २१ दिवस संचारबंदी पुढे ढकलल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाचे संकट मोठे आहेच व त्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय ही योग्य आहे पण आमच्यावर मात्र, बेरोजगारीची कुèहाड कोसळली आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे स्टेशन ऑटो चालक संघाचे अध्यक्ष अल्ताफ अन्सारी यांनी व्यक्त केली. दुसरीकडे ओला, उबेर या टॅक्सी सेवेमुळे तसाही ऑटोचालकांना आधीसारखा व्यवसाय मिळेनासा झाला आहे. त्यात कोरोनाचा तडाखा बसला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून जवळपास ४५० ऑटो धावतात. रोज कमवा रोज खा, अशी आमची पद्धत असते पण कोरोनामुळे पोट कसे भरायचे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असल्याचेही अन्सारी यांनी सांगितले.

कुलींवर उपासमारीची पाळी
१५० वर्षात प्रथमच रेल्वेची चाके थांबली. याचा हातावर आणून पानावर खाणाèयांना सर्वात मोठा फटका बसला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर जवळपास १५२ कुली आहेत. गाड्याच थांबल्याने बहुतेक कुली स्टेशन सोडून गेलेत. रोज कमवायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असे आमचे जीवन आहे. आता मात्र, गाड्याच बंद झाल्याने आमच्या हाताला काम उरले नाही. आता जगायचे कसे असा प्रश्न नागपूर रेल्वे स्टेशन कुली संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी व्यक्त केला.

१५० वर्षात प्रथमच
नागपुरात रेल्वे १८६७ साली आली. १८८१ साली हे शहर कोलकाताशी रेल्वेमार्गाने जोडल्या गेले. सध्या असलेल्या रेल्वेस्थानक इमारतीचे उद्घाटन १५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रँक यांच्या हस्ते झाले होते. त्या दिवसापासून रेल्वे सतत धावत आहे. मात्र, कोरोनाने रेल्वेची चाके थांबविली. नागपूर देशाच्या हृदयस्थानी आहे. त्यामुळे उपराजधानीचे महत्त्व आहे. आता देशच लॉक झाल्याने महत्त्वाचे काय? आता तर जगण्याचा, जगविण्याचा आणि पोटभरण्याचा प्रश्न आहे.

सारे काही थांबले
‘टिकट बताओङ्क म्हणून विचारणारे टीसी स्टेशनवर नाहीत. लोहमार्ग आणि आरपीएफ ठाण्यात सतत गर्दी असते. तक्रारी घेऊन लोक तेथे येत असतात. मात्र, तेथे तीन दिवसांपासून एकही तक्रार नाही, कोणाला व्हीलचेअर पाहिजे असेल तर किंवा गाड्यांची चौकशी करण्यासाठी प्रवासी स्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील चौकशी कक्षात येतात. एखाद्या धावत्या गाडीत कुणी आजारी असेल तर मेडिकल कॉल याच कक्षात येतो. आता हे सारेच थांबले आहे. किती दिवस ही स्थिती राहील, हे कोणीच सांगू शकत नाही.

कुली, ऑटोचालकांसह कामगार संकटात



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39j2HnO
via

No comments