कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आणखी 50 लाखांचा लाखांचा निधी दिला
नागपुर ,अमरावती आणि चंद्रपुर साठी आता पर्यन्त 1 कोटी चा निधी दिला
नागपुर– कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्याकरिता राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी पुन्हा 50 लाख रूपयांचा निधी दिला आहे . हा निधी त्यांनी अमरावती आणि चंद्रपुर जिल्ह्यासाठी दिला आहे . या पूर्वी त्यांनी नागपुर जिल्ह्या साठी 50 लाखा चा निधी दिला होता .
त्यांनी स्थानीय क्षेत्र विकास निधी (एमपीलैड्स ) कमेटी च्या अध्यक्ष यांना एक पत्र लिहून अमरावती आणि चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना विषाणूची रोकथाम, प्रतिबंध व उपचार यासाठी वैद्यकीय उपकरणे, टेस्टिंग किट,आरोग्य कर्मिनां लागणारे अत्याधुनिक ड्रेस, मास्क, व सॅनिटायझर्स इत्यादी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत होणार आहे.ही महामारी रोखण्यासाठी संपूर्ण देशाने एकवटून पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन खासदार डॉ. महात्मे यांनी सर्वांना केले आहे.
जेणेकरून आपल्याला या साथीवर मात करता येईल. संकटाच्या या घटनेत केंद्र व राज्य सरकार पीडितांवर योग्य उपचार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांनाही जागरूक करण्याची गरज आहे. सामान्य लोकांना घरात राहण्याची गरज समजून घेतली पाहिजे. विनाकारण घरा बाहेर पडू नका. या साथीने गरीब – श्रीमंत सगळ्यांनाच त्रस्त केले आहे. सध्या तरी सोशल डिस्टन्स हाच एक मार्ग सयुक्तिक आहे .
आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्या. केंद्र व राज्य सरकार चांगली कामे करीत आहेत. खासदार महात्मे संसदेच्या अधिवेशना नंतर दिल्लीहून परत येताच नागपुरात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सक्रिय झाले आहेत. शासन आणि प्रशासन याबाबत गंभीर असून कोरोना नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे यंत्रणेवरती ताण येत आहे. या पार्श्वभूमिवर नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी आणि प्रशासनालाही निगडीत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून आता पर्यन्त 1 कोटी चा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यावा, अशी सूचना केली आहे.
कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आणखी 50 लाखांचा लाखांचा निधी दिला
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2US7uYb
via
No comments