२४ तासाचे आत खुनातील आरोपीतांना केले गजाआड
नागपुर – खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीत काल रात्री झालेल्या मर्डर मृतकाचे नाव प्रशांत घोडेस्वार वय,३० वर्षे रा. वार्ड क्रमांक ४, खापरखेडा याचा पानठेला लावलेल्या जागेचे कारणावरून एक महिण्या अगोदर सुधीर पिंपळे यांचे सोबत भांडण झाले होते. आरोपी सुधीर पिंपळे यांने मृतकाला त्याच्या पानठेला बाजूला करून ती जागा सागर माहुरकर याला १,००,०००/- रुपयांमध्ये विकले होते.
यातील मृतकाचा पानठेला असलेल्या जागेचा मोबदल्यात मिळण्याकरिता मृतकाने सुधीर पिंपळे यास वारंवार ५००००/- रुपये मिळण्याकरिता तगादा लावून नेहमी वादविवाद करीत होता काल दिनांक २०/०१/२०२१ चे रात्री ९.४५ वा.चे सुधीर पिंपळे हा आपल्या मित्र सागर माहुरकर,कासीम पठाण, सुलतान गडकनोजे, आशिष भड आणि आनंद शिंदे यांचेसह खापरखेडा येथील गजबाब बार मध्ये दारू पित असताना त्याठिकाणी मृतक प्रशांत घोडेस्वार हा आला व त्याने सुधीर पिंपळे यास जागेचा मोबदला म्हणून ५००००/- रुपयाची पुन्हा मागणी केली. त्यादरम्यान त्यांच्यामध्ये वादविवाद झाला काही वेळाने मृतक प्रशांत घोडेस्वार हा राजबाबा बार मधून बाहेर निघताच यातील मृतक प्रशांत घोडेस्वार हा आपल्याला वारंवार पैशाच्या मागणीला कंटाळून आरोपी नामे सुधीर पिंपळे व त्यांच्यासोबत असलेले मित्र आरोपीचे नामे सागर माहुरकर,कासीम पठाण, सुलतान गडकनोजे, आशिष भड आणि आनंद शिंदे यांच्या संगनमत करून मृतक नामे प्रशांत घोडेस्वार याच्या सोबत पाहून वादविवाद करून हाथमुक्कीने मारहाण केली. त्यानंतर धारदार चाकूने गळा कापून गंभीर जखमी करून जागीच ठार केले व घटनास्थळावरून पसार झाले.
सदर घटनेची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांना प्राप्त होताच त्यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून आपल्या अधिनस्त पथकास मार्गदर्शन करून वरील नमूद फरार आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार यातील आरोपी हे घटनेनंतर अमरावती रोडनी पळून गेल्याचे समजले.त्यावरून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे मूर्तिजापूर ते अकोला या मार्गावर असल्याचे माहिती झाल्याने आरोपीतांचा मागोवा घेत असताना यातील आरोपी नामे
१)सागर कृष्णराव माहुरकर, वय ३० वर्ष,
२)कासीम आयुब पठान ,वय ३८ वर्ष,
३) सुधीर भागवतराव पिंपळे वय ३६ वर्ष
४)सुलतान रहीम गडकनोजे,वय २० वर्ष,
५)आशिष सुरेश भड वय ३१ वर्ष, सर्व राहणार खापरखेडा. हे बोरगाव (म) या गावात मिळुन आल्याने त्यांना त्याठिकाणाहुन स्टापच्या मदतीने ताब्यात घेतले.तसेच यातील आरोपी क्र.६) नामे आनंद रामभाऊ शिंदे वय ३० वर्ष सर्व रा.खापरखेडा यास दहेगाव ( रंगारी )येथून ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करिता नमूद सहा ही आरोपीतांना पोलीस स्टेशन खापरखेडा यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला नागपूर ग्रामीणचे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जिट्टावार यांचे सहा. निरीक्षक राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख सफौ. लक्ष्मीप्रसाद दुबे, पोलीस हवालदार विनोद काळे ,नापोशि अरविंद भगत,राजू रेवतकर, रामा आडे, सत्यशिल कोठारे,शैलेष यादव, पोलीस शिपाई रोहन डाखोरे,विरेन्द्र नरड़ , सतीश राठौड़ यांनी पार पाडली .
२४ तासाचे आत खुनातील आरोपीतांना केले गजाआड
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Y3vvh0
via
No comments