नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप
ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल १५४११ प्रवाश्यानी केला मेट्रो ने प्रवास
नागपूर – काल दिनांक १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली तब्बल १५४११ पेक्षा जास्ती नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतच्या सर्वात मोठा ऊंचाक आहे महत्वपूर्ण म्हणजे १ जानेवारी २०२१ (शुक्रवार) रोजी छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधाकामा करीता ऑरेंज मार्गिकेवरील (रिच – १) सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा बंद होती. काल एक मेट्रो लाईन बंद असून देखील मेट्रोच्या प्रवासी सेवा मध्ये वाढ ही महत्वपूर्ण बाब आहे.
मेट्रोच्या प्रवासी संख्येत गेले काही दिवस सातत्याने वाढ होत असून मागच्या रविवारी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली होती ज्यामध्ये तब्बल २२१२३ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला होता .एवढच नव्हे तर सुटीचा दिवस वगळता इतर दिवसाला देखील मेट्रोची सरासरी रायडरशिप १० हजाराच्या वर आहे.
नागपूर शहरामध्ये २५ कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे नागरिकांन करिता उपलब्ध असून या मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाश्यांच्या सेवेकरता सज्ज आहे. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी व सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान नियमित मेट्रो सेवेचा लाभ घेत येत आहे.
महा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अॅेम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.
या व्यतिरिक्त महा मेट्रोतर्फे नागरिकांन करता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अनोखी योजना आखण्यात आली असून फक्त ३००० रुपये मध्ये संपूर्ण ३ कोचच्या मेट्रो ट्रेन मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट,लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरा करू शकतात तसेच प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांची याला देखील पसंती मिळत आहे. महा मेट्रोच्या वतीने नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. जेथे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स उपलब्ध आहे. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3n63cIX
via
No comments