मेट्रोच्या नागपूर फेसबुक पेजला ६ लाख लाईक्स
६ वर्षात गाठला महत्वाचा पल्ला*

नागपूर : नागपूर मेट्रोचे काम सुरु झाले तेव्हा ६ वर्षाआधी सुरु केलेले फेसबुक पेज आज ६ लाख नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. संपूर्ण शहरात सुरु असणाऱ्या मेट्रो बांधकामाची अद्ययावत माहिती तसेच प्रवासी सेवेची विस्तुत माहिती तपासणे आणि मनात येणाऱ्या शंकांचे निरसन करून घेणे त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं इथे मिळत असल्याने झपाट्याने चाहता वर्ग वाढणारं शहरातील हे लोकप्रिय अव्वल फेसबुक पेज आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज संपूर्ण देशभरातील सर्व शासकीय विभागाच्या फेसबुक पेज’च्या तुलनेत सर्वात ज्यास्त फॉलोवर्स’ची संख्या असणारे पहिल्या क्रमांकावर असणारे पेज ठरले आहे.
मेट्रोच्या फेसबुक पेजवर नागरिकांना सतत प्रकल्पाविषयी अपडेटेड ठेवले जाते. प्रकल्पाचे प्रवासी सेवेची माहिती, बांधकाम, स्थानकांच्या स्थापत्य कलेशी संबंधित माहिती, बाह्य-आंतरिक सज्जा, प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक माहिती, वापरण्यात येणाऱ्या यंत्राविषयी माहिती, कार्यादरम्यानचे आकर्षक छायाचित्रे या पेजवर शेअर केली जातात. याशिवाय नागरिकांना जोडून ठेवण्यासाठी वेळोवेळी अनेक ऑनलाईन स्पर्धा उपक्रम देखील आयोजित केल्या जातात. नागरिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असतात. येथे नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची यथोचित उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते हि या पेजची वैशिष्ठ्ये आहेत. ‘लाईक, कमेंट्स व शेयर’च्या माध्यमाने सतत नागरिक या पानावर ऍक्टिव्ह राहतात.
एका आठवड्याला ५ लाखावर नागरिक पेजला भेट देतात तसेच २०००० नागरिकांशी संवाद साधला जातो. ७०००० नागरिक आठवडाभऱ्यात कुठल्यातरी स्वरूपात पोस्टवर प्रतिसाद देतात. आजपर्यंत सुरु असलेल्या बांधकामाव्यतिरिक्त मेट्रोमुळे होणारे लाभ, शहराचा विकास, तांत्रिक बाबी, रोजगार अश्या सर्वव्यापी प्रश्नांना नागरिकांनी विचारलेल्या भाषेत तसेच त्यांना समजेल अश्या स्वरूपात सविस्तर उत्तरं देऊन त्यांचे समाधान केले जाते. या प्रश्नातून निर्माण होणाऱ्या शंका परस्पर जाऊन सोडवण्यासाठी दर आठवड्याला नागरिकांच्या समस्त ‘मेट्रो संवाद’ नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.तसेच विदर्भ संवाद देखील महा मेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे. या या कार्यक्रमात त्या त्या विभागातील वरिष्ठ प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांशी हितगुज साधतात. निव्वळ तांत्रिक पोस्टच नाही तर विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक शैक्षणिक इव्हेंट अश्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांशी सलोख्याचे ऋणानुबंध जोडून घेण्याचा प्रयत्न नागपूर मेट्रो चमू सदैव करीत असते.
नागरिकांच्या फायद्याचे असणारे काही माहितीपूर्ण कार्यक्रम ‘फेसबुक लाईव्ह’ स्वरूपात तर व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांचा नागरिकांसाठी असलेल्या सूचना अनेकदा व्हिडीओ रूपात नागरिकांपर्यंत पोचवले जातात.फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या माहितीच्या आधारे नागरिकांना महामेट्रोच्या कार्याची अद्ययावत माहिती मिळत असते.
मेट्रोच्या नागपूर फेसबुक पेजला ६ लाख लाईक्स
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3nsMpjz
via
No comments