राज्य अपघात मुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार -परिवहन मंत्री ॲड. अनिल परब
नागपूर : राज्यातील परिवहन विभागाचे काम हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. आज रोजी एकुण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सुविधांपैकी 80 सुविधा या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात. पुढील काळात परिवहन विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे. परिवहन विभागाच्या माध्यमातून राज्याला अपघात मुक्त करण्याचा निर्धार असल्याचे आश्वासक प्रतिपादन परिवहन व संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज सांगितले.
नागपुरातील नारा रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालय (नागपूर ग्रामीण) उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री परिणय फुके, विकास कुंभारे, गिरीश व्यास, मोहन मते, आशिष जैस्वाल, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपुरात आधुनिक पध्दतीची परिवहन विभागाची झालेली ही इमारत नागपूरकरांना तत्पर सेवा देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे परिवहन विभागातर्फे राज्यात उत्तम काम चालले असून प्रत्येक वाहन तपासणीसाठी जिल्ह्यात इन्स्पेक्शन व सर्टिफिकेशन सेंटर देण्यात येणार आहे. संगणकीय ट्रॅक विकसीत करून उत्तम वाहक घडविण्यात येत आहेत.
उत्तर नागपुरात आरटीओ कार्यालयाची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना परिवहन व शिकाऊ अनुज्ञप्ती तसेच शिकाऊ परवाने आणि अन्य कामासाठी सुविधा झाली आहे.मानेवाडा येथील वाहक प्रशिक्षण केंद्राला मंजूरी देण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे हया देखील या कार्यक्रमा ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.परिवहन विभागाने ई -इंधनाचा उपयोग करून प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी विभागाच्या कामाचा एक धावता आढावा घेतला.
केंद्राकडून राज्याच्या परिवहन विभागाला संपूर्ण सहकार्य राहील असे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आश्वस्त केले.यावेळी बोलताना गडकरी म्हणाले परिवहन क्षेत्रामध्ये अधिक काम करण्याला चांगले काम करायला प्रचंड वाव आहे बायो सीएनजी ,मिथेनॉल, इथेनॉल इंधनाचा वापर करणे आणि त्यातुन प्रदुषण पुरक वाहन विकसीत करावीत.आणि त्यांनी अनेक उदाहरणांसह स्पष्ट केली राज्यासह नागपूरला अपघात मुक्त करण्याचा संकल्प सिद्ध करण्यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
देशात साधारणत दरवर्षी पाच लाख अपघात होतात .त्यापैकी दीड लाख लोकांचा मृत्यु होतो. मृत्यु होणाऱ्यांत 18 ते 35 वयोगटातील तरूण मृत्युमुखी पडतात ही गंभीर बाब आहे. अपघात मुक्त राज्य संकल्पना राबवण्यासाठी तामिळनाडू पॅटर्न वर काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील परिवहन अधिकाऱ्यांनी तामिळनाडु पॅटर्नचा अभ्यास करावा.अपघातमुक्तीसाठी खासदारांच्या अध्यक्षतेखालील समिती चांगले काम करत असून डॉक्टर विकास महात्मेच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.शासकीय
वाहनचालकांची डोळ्यांची तपासणी आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला .इलेक्ट्रिक बसेस च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करता येईल आणि देशात 22 लाख वाहनचालकांची आवश्यकता असून उत्तम व प्रशीक्षीत चालक तयार करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, यांनी केले तर संचलन रेणुका देशकर तर आभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले
इमारतीची वैशिष्टये
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) हे 1 डिसेंबर 2003 पासून कार्यान्वित झाले. या कार्यालयाअंतर्गत नागपूर महानगर पालिका क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, व भंडारा या कार्यालयाचा व आधुनिकीकरण व संगणकीकृत सीमा तपासणी नाके कांद्री-रामटेक, खुर्सापार-सावनेर,केळवद, शिरपूर-देवरी व देवाडा- राजूरा यांचा समावेश आहे. हे कार्यालय जुलै, 2008 पासून अन्नधान्य विभागाच्या लाल गोडाऊन मध्ये कार्यरत होते. पाच एकरावर तीन मजली बांधकाम असलेल्या या सुसज्ज् इमारतीत परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.
राज्य अपघात मुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार -परिवहन मंत्री ॲड. अनिल परब
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38b8COs
via
Post Comment
No comments