अवैध वाळूची तस्करी करणारा ट्रक वाडी पोलिसांच्या ताब्यात
– चालकासह-मालकावर गुन्हा दाखल!
वाडी : मागील अनेक दिवसांपासून वाळूची अवैधरित्या तस्करी करणारे सक्रीय झाल्याची माहिती वाडी पोलिसांना होती या आधारावर गुरुवारी केलेल्या आकस्मिक कार्यवाहीत ट्रक सह त्यात असलेली चोरीची वाळू जप्त करण्यात आली आहे.
वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लावा नजीकच्या चौकात सापळा रचून या ठिकाणावरून रेती भरून जाणारा ट्रक क्र.MH-40 AK -7284 ला थांबविले व ट्रक चालक शेख मेहबूब शेख खलील वय-27 वर्ष रा.जगदिश नगर,काटोल बायपास याला रेती कुठून आणली,रॉयल्टी मागितली असता त्याच्या जवळ कोणतेही अधिकृत परवाना,कागदपत्रे दिसून आली नाही.तसेच ट्रक चे ही कागदपत्रे ही त्याच्या कडे नव्हती.अधिक माहिती घेतली असता त्याने ही रेती सांदिपनी स्कूल काटोल रोड येथून
त्यांचे मालक विठाभाई संभाड रा.काटोल नाका गिट्टीखदान,नागपुर यांच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले.यावरून या दोघांनीही स्वतःचे आर्थिक फायदा करिता रेतीची चोरी केल्याचे स्पष्ट झाले.पथकातील कर्मचारी पो.उप.नि.जायभाये,नंदकिशोर गिरिधर,पो.हे.काॅ.सुनिल मस्के,नंदकिशोर
रडके,प्रदीप,सतिश,ईश्वर राठोड यांनी ट्रक व रेती ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणले. ट्रक च्या आत 350 फूट रेती व ट्रक ऐकून 4 लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.वाडी पोलिसानी कार्यवाही करीत भा.द.वि.कलम 379,34 नुसार ट्रक चालक शेख मेहबूब शेख खलील व मालक विठाभाई संभाड यांचेवर गुन्हा दाखल केला.ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नुर उल हसन,सहायक आयुक्त अशोक बागुल व वाडी पो.नि.प्रदीप सूर्यवंशी याच्या मार्गदर्शनात यशस्वी करण्यात आली.
अवैध वाळूची तस्करी करणारा ट्रक वाडी पोलिसांच्या ताब्यात
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2XxvXnD
via
No comments