सीएमआरएस २ दिवसीय नागपूर मेट्रोच्या दौऱ्यावर
– रचना जंव्कशन आणि शंकर नगर चौक मेट्रो स्टेशनची करणार पाहणी
नागपूर – अँक्वा लाईन (रिच ३) मेट्रो रेलप्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस), दोन दिवसीय दौऱ्यावर ‘सीएमआरएस’ आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा श्री. जनक कुमार गर्ग आणि त्यांचे सहयोगी हिंगणा मार्गावरील रचना जंव्कशन आणि शंकर नगर चौक मेट्रो स्टेशनचे परीक्षण करणार आहे.
उत्तर अंबाझरी मार्गावरील रचना जंव्कशन आणि शंकर नगर चौक मेट्रो स्टेशन ‘अँक्वा थीम’ वर बनविण्यात आले आहे. हिंगणा मार्गावर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. मुख्य बाब म्हणजे नुकतेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर आणि एलएडी मेट्रो मेट्रो स्टेशन देखील नागरिकांन करिता खुले करण्यात आले असून १६ मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा करिता खुले आहेत.
अँक्वा लाईन मार्गावर रचना जंव्कशन (३४८८. ०७), शंकर नगर चौक (६९९६. ००) वर्ग मीटर क्षेत्रामध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली असून स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.
सीएमआरएस २ दिवसीय नागपूर मेट्रोच्या दौऱ्यावर
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39BiG4u
via
No comments