अखाद्य बियांपासून बायोडिझलमुळे शेतकऱ्यांना रोजगार :केंद्रीयमंत्री नितीन गडकरी.
ग्रीन क्रूड बायोफ्यूअल फाऊंडेशनतर्फे रोप वितरण.
नागपूर : अखाद्य तेल बियांपासून बायोडिझल तयार होते. तीन किलो बियांपासून एक लिटर डिझल तयार करता येते. याशिवाय ढेपही निघते. यावर संशोधन करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यातून मोठा रोजगार मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
ग्रीन क्रूड बायोफ्यूअल फाऊंडेशनतर्फे करंजीचे रोपटे वाटपाचा कार्यक्रम वर्धा मार्गावरील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी ग्रीन क्रूड बायोफ्यूअल फाऊंडेशनचे संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, सचिव अजित पारसे, उपाध्यक्ष डॉ. राजेश मुरकुटे, गडचिरोली प्रकल्प समन्वयक विनय साळवे, युवा शाखा समन्वयक हर्षवर्धन फुके उपस्थित होते. गडकरी यांनी गडचिरोलीवरून आलेल्या शेतकऱ्यांना रोप वाटप करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गावात अखाद्य तेल बियांपासून डिझलसाठी बायोडिझलचा प्लांट टाकला तर ते शक्य आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तापमान १५ डिग्री खाली जाते, तेव्हा या बियांपासून निघालेले इंधन गोठते. हे दोन महिने सोडल्यास काहीही अडचण नाही. पेट्रोल पंपावरील डिझलपेक्षा हे डिझल स्वस्त आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले इंधन आहे. हे झाडे एकल विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने पाच झाडे लावले एकाला तीस किलो बियाणे मिळतील. अशाप्रकारे दीडशे किलो बियाणे होतील.
यातून इंधन तयार करता येईल. शहरात ही झाडे लावल्यास वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड कमी होईल. तंत्रज्ञान गरीब माणसांपर्यंत नेणे आवश्यक आहे. त्यांना यातून रोजगार मिळेल. गडचिरोली जिल्ह्यात रिफाईनरी टाकण्याचे स्वप्न आहे. बांबूपासून विमानाचे इंधन तयार करता येईल. २० हजार कोटी इंधन आयातीवर खर्च होत आहे. ते दोन लाख कोटींवर आणण्याचे स्वप्न आहे. बचतीतील १ लाख कोटी शेतकऱ्यांच्या खिशात जातील, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. हेमंत जांभेकर यांनी केले तर आभार अजित पारसे यांनी मानले.
झाडांना इ-टॅग
झाडांना इ-टॅग करता येईल. अजित पारसे यांचा सॉफ्टवेअर व संबंधित तंत्रजज्ञानात हातखंड आहे. त्यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी पारसे यांनीही मदत व मार्गदर्शनाची तयारी दर्शविली.
अखाद्य बियांपासून बायोडिझलमुळे शेतकऱ्यांना रोजगार :केंद्रीयमंत्री नितीन गडकरी.
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3nU9qwG
via
No comments