उज्ज्वल नगर व काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनचे कार्य गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करा: दिक्षित
नागपूर – महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पातर्गत रिच – २ व रिच – ४ येथील निर्माण कार्य गतीने सुरु असून ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उर्वरित मेट्रो स्टेशनचे कार्य देखील गतीने सुरु आहे याच अनुषंगाने आज महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षित यांनी उज्ज्वल नगर व कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली.पाहणी दरम्यान डॉ. दीक्षित यांनी निर्माणाधीन कार्याचा आढावा अधिकाऱ्याकडून घेतला तसेच या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन गुणवत्तापूर्ण कार्य जलद गतीने लवकरात लवकर कार्य पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्याना दिल्या जेणेकरून सदर मेट्रो स्टेशन नागरिकांकरिता खुले करण्यात येईल. महत्वपूर्ण म्हणजे महा मेट्रोने सप्टेंबर महिन्यात अजनी चौक, रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुभाष नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन देखील प्रवाश्यानकरिता अनलॉक करण्यात आले.
ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उज्ज्वल नगर (१००००.०) व कॉंग्रेस नगर (७०३७.००) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात येत आहे स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी राहणार आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात येणार आहे. काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन अजनी रेल्वे स्टेशनला संलग्न असून अजनी येथे भारतीय रेल्वेच्या प्रवाश्याना मोठ्या प्रमाणात या मेट्रो स्टेशनचा फायदा होणार आहे. रेल्वे स्टेशन येथून बाहेर पडताच सहज पणे मेट्रो स्टेशन येथे पोहोचून पुढील प्रवास करने शक्य होईल.
सध्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज,रहाटे कॉलोनी, अजनी चौक, जयप्रकाश नगर, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच ऍक्वा लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज ,झांसी राणी चौक, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,शंकर नगर चौक,एलएडी चौक,सुभाष नगर,रचना रिंग रोड जंकशन,वासुदेव नगर, बंसी नगर, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु नागरिकांनकरीता सुरु आहे.
यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना मेट्रो स्टेशनची सविस्तर माहिती प्रदान केली. कार्यकारी संचालक श्री. अनिल कोकाटे, श्री.नरेश गुरबानी,तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
उज्ज्वल नगर व काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनचे कार्य गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करा: दिक्षित
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3nVJVuY
via
No comments