नागपूर मेट्रोचा प्रवास सुरक्षित व सुविधायुक्त : मेट्रो प्रवासी
– नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी केला मेट्रोने प्रवास,सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर गाण्याची, शॉपिंगची, खाण्याची मेजवानी नागरिकांनी केली धमाल
नागपूर – आजचा दिवस नागपूरकरांनी खऱ्या अर्थाने मेट्रो दिवस म्हणून साजरा केला. आज विविध संघटना तसेच मेट्रो प्रवाश्यानी महा मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. महा मेट्रोच्या वतीने प्रवाशांच्या सोइ करता सातत्याने अनेक विविध उपाय योजना केल्या जात आहे या अंतर्गत मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास करणे, सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर सारख्या अनेक विविध उपाय योजना महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता केल्या आहेत. या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.
आज रविवारी सुट्टीच्या दिवशी शहर भ्रमणाला निघालेल्या नागपूरवासियांकरिता महा मेट्रोने संगीताची मेजवानी ठेवली सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातर्फे बँड वादनाचे कार्यक्रम तसेच संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान नागपूरच्या नावाजलेल्या सचिन आणि सुरभी ढोमणे यांच्या सूर संगम संस्थेतर्फे गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा नागरिकांनी पुरेपूर फायदा घेतला व आपले अनुभव प्रवासा दरम्यान व्यक्त केले.
या व्यतिरिक्त महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे १० स्टॉल्स देखील सीताबर्डी इंटरचेंज येथे लावण्यात आले होते जेथे खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल लावण्यात आले होते या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरणपूरक वस्तू देखील विक्रीला उपलब्ध होत्या नागपूरकरांनी मेट्रोने प्रवास करून या सर्व सोईंचा लाभ घेतला.
आज विविध संघटनानी ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास करत, मेट्रो सेवेचा पुरेपूर उपयोग केला. या मध्ये नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे सुमारे १५० सदस्यांनी मेट्रोने प्रवास करीत आपले अनुभव व्यक्त केले.
नागपूर शहरामध्ये मेट्रो उपलब्ध असून याचा आम्हाला अभिमान आहे, येत्या काळात इतर ठिकाणावरून देखील मेट्रोनंर प्रवास करता येणार आहे, जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असे आवाहन श्री. स्वप्नील अहिरकर यांनी केले.
मेट्रो प्रवासा दरम्यान सहज व सुखकर प्रवास अनुभवता येतो मेट्रो सर्वांन करीत उपयुक्त असून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेट्रोचा उपयोग करून आपला दैनंदिन प्रवास करावा असे उदगार डॉ. हिना मुनियार ने व्यक्त केले.
आमच्या सारख्या सिनियर सिटीझन करिता मेट्रो सेवा सहज व सुलभ आहे कुठल्याही त्रासाविना आमच्या सारखे वृद्ध नागरिक मेट्रोचा उपयोग करू शकतात असे मत श्रीमती. देशपांडे यांनी व्यक्त केले.
शहरात चांगले कार्य महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे, स्टेशन परिसरात साफ सफाई,कोविड च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाय योजना अतिशय चांगल्या आहेत स्टेशन परिसरात प्रवेश पासून ते प्रवासा पर्यंत योग्य काळजी मेट्रो प्रवाश्याची महा मेट्रोच्या वतीने घेण्यात येत आहे, आमच्या सारख्या तरुणांनी सार्वजनिक परिवहन साधानांचा उपयोग जास्तीत जास्त करायला पाहिजे असे विचार कु. प्रीती दानवे ने व्यक्त केले.
नागपूर मेट्रोचा प्रवास सुरक्षित व सुविधायुक्त : मेट्रो प्रवासी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2KVXHiP
via
No comments