Breaking News

अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य, महाराष्ट्र पोलिसांचे आभार; अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

Nagpur Today : Nagpur News

अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. आजच्या दिवसासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसंच माझ्या बाबांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असूनही कोणतीही कारवाई झाली नाही,” असं आज्ञा नाईक म्हणाल्या.

मुंबई : “अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासह नावं लिहिली आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आणि आजीने आत्महत्या केली. आजच्या दिवसासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्र पोलिसांनी यापुढे निपक्ष तपास करावा. आम्हाला राजकारण करायचं नाही, फक्त न्याय हवा आहे,” अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी दिली. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

माझ्या वडिलांनी आणि आजीने 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितीश सार्डा या तिघांची नावं आहेत. अर्णब गोस्वामी यांच्यामुळेच अन्वय नाईक यांना त्यांच्या कामाची उर्वरित रक्कम मिळाली नाही. ती रक्कम दिली असती तर ते आज जिवंत असते, असं अक्षता नाईक यांनी सांगितलं. तर आज्ञा नाईक यांच्या माहितीनुसार, “अर्णब गोस्वामी सातत्याने माझ्या वडिलांना धमकी देत होते, तुला पैसे कसे मिळतात तेच पाहतो. तुझ्या मुलीचं करिअर उद्ध्वस्त करतो, अशी धमकी दिली होती.”

संपूर्ण काम 6 कोटी 40 लाख रुपयाचं होतं. 83 लाख रुपयांचं देणं होतं. परंतु ते पैसेही त्यांनी दिले नाही, असा दावा अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य, महाराष्ट्र पोलिसांचे आभार; अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/362x9Dh
via

No comments