Breaking News

‘संकटातून नवनिर्मितीकडे’ शासकीय योजनांची उपयुक्त पुस्तिका – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Nagpur Today : Nagpur News

भंडारा : कोविड-19 च्या कठीण काळात शासनाने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची एकत्रित माहिती असलेली ‘संकटातुन नवनिर्मितीकडे’ ही पुस्तिका उपयुक्त व माहितीपूर्ण अशीच आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित ‘संकटातुन नवनिर्मितीकडे’ या ‍पुस्तिकेचे विमोचन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयाची एकत्रित पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे विमोचन आज नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुलमंत्री बाळासाहेब थोरोत यांचे मनोगत देण्यात आले आहे.

शेती व ग्रामविकास अंतर्गत कृषी, फुलोत्पादन, सहकार, पणन, ग्राम विकास, मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स व्यवसाय पाणी पुरवठा व स्वच्छता. शिक्षण व युवक अंतर्गत शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वौद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण. सामाजिक घटकांर्तर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजनकल्याण, अल्प संख्यांक विकास, आदिवासी विकास, उद्योजकता अंतर्गत उद्योग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कामगार रोजगार हमी इत्यादी योजनांच्या निर्णयाचा समावेश करण्यात आला आहे.

यासोबतच कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, गृह निर्माण, परिवहन, पर्यटन, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, उर्जा, सार्वजनिक आरोग्य, मदत व पूनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन अन्न व नागरी पुरवठा यासह महसुल, वित्त व नियोजन, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान व संसदीय कार्य विभागाने घेतलेल्या लोककल्याणकारी व महत्वाच्या निर्णयाची एकत्रित माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्री मंडळातील मंत्र्यांच्या खात्याची माहितीसुद्धा या पुस्तिकेत देण्यात आली आहे. ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त असून शासनाने घेतलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती देणारी उपयुक्त पुस्तिका आहे, असे वर्णन विधानसभा अध्यक्षांनी केले आहे.

‘संकटातून नवनिर्मितीकडे’ शासकीय योजनांची उपयुक्त पुस्तिका – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/34oTSK8
via

No comments