Breaking News

भंडारा जिल्ह्यात आज 133 रूग्णांना डिस्चार्ज

Nagpur Today : Nagpur News

– 151 कोरोना पॉझिटिव्ह, बरे झालेले रुग्ण 3778, पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 5589, क्रियाशील रुग्ण 1687, आज 05 मृत्यू, एकूण मृत्यू 124

भंडारा : जिल्ह्यात आज 947 व्यक्तींचा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीत आले असून त्यापैकी 151 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 45 हजार 570 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 5589 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज 133 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3778 झाली असून आज 151 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5589 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68 टक्के आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 74, साकोली 17, लाखांदूर 07, तुमसर 15, मोहाडी 12, पवनी 22 व लाखनी तालुक्यातील 04 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 3778 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 5589 झाली असून 1687 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 05 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 124 झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 2889, साकोली – 412, लाखांदुर- 241, तुमसर- 504, मोहाडी- 523, पवनी- 494 व लाखनी- 526 असे एकूण 5589 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 3778 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.21 टक्के एवढा आहे.

आज 01 ऑक्टोबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 204 व्यक्ती भरती असून 2156 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यात आज 133 रूग्णांना डिस्चार्ज



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3l7OWyI
via

No comments