मास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत ३१६६ व्यक्तिं विरुध्द कारवाई
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवार (२८ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १६८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ८६३६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. २६,७७,०००/- चा दंड वसूल केला आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २७, धरमपेठ झोन अंतर्गत १२, हनुमाननगर झोन अंतर्गत १३, धंतोली झोन अंतर्गत १४, नेहरुनगर झोन अंतर्गत ९, गांधीबाग झोन अंतर्गत १५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १५, लकडगंज झोन अंतर्गत १५, आशीनगर झोन अंतर्गत २७, मंगळवारी झोन अंतर्गत १७ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द सोमवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे.
नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.
मास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3ibGDA0
via
No comments