डॉ. प्रशांत गायकवाड मोदी रत्न पुरस्काराने सन्मानित
नागपुर – भारतीय मोदी आर्मी यांच्या वतीने नागपूरचे डॉ. प्रशांत गायकवाड यांना भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारतीय मोदी आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव आहुजा मोदीजीं चे परममित्र तसेच कामगार व रोजगार राज्यमंत्री (यूपी सरकार) डॉ. रघुराजसिंह यांच्या हस्ते हार, पगडी व शॉल श्रीफळ देऊन ‘मोदी रत्न सन्मान’ (मेमोन्टों व तलवार) देऊन गौरविण्यात आले.
डॉ .गायकवाड यांना १७ सप्टेंबर २०२० रोजी, टिडौली या गावी, जिल्हा सहारणपूर येथे दरवर्षी होणाऱ्या पुरस्कार समारंभात समाजामध्ये चांगले कार्य करणारे व्यक्तींना सन्मानित केले जाते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर या आजारामुळे डॉ. प्रशांत गायकवाड तथा तबला वादक यांनी समाजासाठी खूप काही कार्य केले.
त्यांनी लोकांपर्यंत धडपडत अन्नधान्य वाटप केलेत. समाजातील गरीब भूकेल्यांना, गरजू लोकांना व इतरांना ही मदत केली व समाजामध्ये कोरोनापासून मुक्त होण्यासाठी जनजागृती सुद्धा केली. डॉ. प्रशांत गायकवाड हे प्रसिद्ध तबला वादक असून 47 देशातील कलाकारांना भारतीय कला आणि संस्कृतीची शिकवणूक देवून या जगाच्या पाठीवर भारत देशाचे नाव रोशन केले .
व त्यांनी जागतिक विश्वविक्रम केल्यामुळे त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स 14 मार्च 2020 रोजी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरीनी विश्व रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच डॉ. प्रशांत गायकवाड यांनी 2009 मध्ये सलग 324 तास तबला वाजवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून मराठा भूषण पुरस्कार मिळविला आहे. डॉ. प्रशांत गायकवाड नागपूर जिल्ह्यातील (सह आयुक्त ) स्काऊट या पदावरील कार्यरत होते.
त्यांनी खूप सेवा केल्यामुळे ‘मेडल ऑफ मेरीट ‘ महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते ही प्राप्त केले आणि हिंदू वेलफेयर फाउंडेशन भारत सरकार सूचिबद्ध यांच्या वतीने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चे ब्रँड अँम्बेंसडर म्हणून नियुक्त केले होते. उच्च विद्या विभूषित डॉ. गायकवाड निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे ब्रँड ॲम्बेसेडर आजही आहे. गरीब आणि अनाथ मुलांनाही मोफत शिक्षण देऊन ते नेहमीच मदत करते.
अशा शेकडो पुरस्कारांनी त्यांचा सन्मान व सन्मानित केल असून “मोदी रत्न सन्मान “या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र व नागपूरच्या चाहत्यांकडून व या पुरस्काराबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. प्रशांत गायकवाड मोदी रत्न पुरस्काराने सन्मानित
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2G3RIpV
via
No comments