Breaking News

*शिक्षकांना युनियन बँकेतर्फे विमा संरक्षण

Nagpur Today : Nagpur News

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्याला यश
कर्मचारी मृतक झाल्यास ४९ व ५९ लाखाचे विमा कवच
नागपूर जिल्ह्य़ातील २७ हजार शिक्षकांना फायदा

नागपूर – प्रदीर्घ लढ्यानंतर युनियन बँकेच्या पगारदार शिक्षक शिक्षकेतर खातेधारकांना विमा संरक्षण कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता.

नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेतून नागपूर जिल्ह्य़ातील २७ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार खाते २०१२ मध्ये युनियन बँकेत वळविण्यात आले होते. मात्र या पगारदार खातेधारकांना विमा संरक्षण कवच लागू करण्यात आले नव्हते. युनियन बँकेतील पगारदार खातेधारकांना विमा संरक्षण कवच लागू करण्यात यावे यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) गेल्या चार वर्षांपासून शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात पाठपुरावा सुरु होता. उपक्षेत्रीय प्रबंधक श्री अरविंदकुमार यांच्यामार्फत मुंबई मुख्य कार्यालयात हा विषय रेटण्यात आला होता.

या विषयावर १९ जुलै २०१९ रोजी विमा संरक्षण संदर्भातील प्राथमिक बैठक पार पडली होती. अखेर पगारदार खातेधारकांना विमा संरक्षण कवच लागू करण्याचा निर्णय आज (ता ६) युनियन बँकेत उपक्षेत्रीय प्रबंधक श्री अमरनाथ गुप्ता व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे. यावेळी शिक्षकांच्या हितार्थ आवाज बुलंद केल्याबद्दल युनियन बँकेतर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांचा बॅकेच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या योजनेत युनियन सुपर सॅलरी अकाउंट अंतर्गत २५ ते ७५ हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४९ लाख तर ७५ हजारच्या वर पगारदार खातेधारकांना ५९ लाख रुपये मृत्यू पश्चात कुटुंबियांना विमा संरक्षण कवच लागू करण्यात आले आहे. यात पाच लाखाचे कॅन्सर केअर आरोग्य विमा सुध्दा अंतर्भूत आहे.

युनियन बँकेतर्फे उपक्षेत्रीय प्रबंधक अमरनाथ गुप्ता, मुख्य व्यवस्थापक सिध्दार्थ गजभिये, वरिष्ठ प्रबंधक श्री मकरंद फडणीस, प्रबंधक श्री सिध्दार्थ चंद्रा तर या बैठकीला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, जिल्हा महिलाध्यक्ष प्रणाली रंगारी, माध्यमिक संघटक शेषराव खार्डे, ग्रामीण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, माध्यमिक संघटक नंदा भोयर, पुष्पा बढिये, अपंग विभाग संघटक दिनेश गेटमे, शहर संघटक समीर काळे, नगर परिषद संघटक रुपाली मालोदे, कळमेश्वर तालुका संघटक गणेश उघडे, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघाचे राज्य सहसचिव महेश गिरी, काॅगेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय धरममाळी, मनीषा बढिये उपस्थित होते.

*शिक्षकांना युनियन बँकेतर्फे विमा संरक्षण



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/30ADuEA
via

No comments