कामठी तालुक्यात 51 रुग्ण आढळले कोरोना पॉजिटिव्ह
कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रनात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन सज्ज असले तरी दैनंदिन कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही कमी होताना दिसत नाही तर आज आलेल्या कोरोना पोजिटिव्ह अहवाला नुसार कामठी तालुक्यात 51 रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळले यानुसार आतापर्यंत एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 616 झाली असून 14 रुग्ण हे कोरोनाला बळी ठरले आहेत तर आजपावेतो यातील 258 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत तर यानुसार आजपावेतो 344 रुग्ण हे ऍक्टिव्ह असून उपचार घेत आहेत.
आज आढळलेल्या 51 कोरोनाबधित रुग्णामध्ये कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या ग्रामीण भागात 11 रुग्ण आहेत तर शहरात 40 रुग्ण आहेत ज्यामध्ये कसार ओली कामठी 01, काठी ओली कामठी 03, कोळसाटाल01,गुजरी बाजार 01,गुड ओली 01, चिंततरंजन नगर 01, जयभीम चौक 01, तंबाकू ओली 01, तुंमडीपुरा 02, दार्जिपुरा 01, इस्माईलपुरा 01, नया गोदाम 03, नया बाजार 01,पेरकीपुरा 02,प्रबुद्ध नगर 01, फुटाना ओली 02, फुल ओली 03, भाजी मंडी 01, मोंढा 01, मोठ्या मस्जिद जवळ 03, यशोधरा नगर 01,यादव नगर 02, रमानगर 02, रॉय हॉस्पिटल जवळ 01, वाढईपुरा संघ मैदान 01, वारोसपुरा कामठी 01 , वारीसपुरा मदरसा कामठी च्या 1 रुग्णाचा समावेश आहे. या सर्व कोरोनाबधित रुग्णांना नागपूर च्या मेयो -मेडिकल इस्पितळात हलविण्यात येत आहे.
संदीप कांबळे कामठी
कामठी तालुक्यात 51 रुग्ण आढळले कोरोना पॉजिटिव्ह
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/30jJpxF
via
No comments