Breaking News

उदघाटन कार्यक्रमातच केला वाढदिवस साजरा

Nagpur Today : Nagpur News

महावितरणच्या अधिकाऱ्याचा प्रताप
शासकीय अधिकाऱ्यानकडूनच सोशल डीस्टनसिंग चा फज्जा

नागपूर– नागपूर परिमंडळात अजनी परिक्षेत्रांतर्गत १० एम व्ही ए च्या नवीन ट्रान्सफॉर्मर उदघाटन कार्यक्रमात नागपूर जिल्हा महावितरणचे अधीक्षक अभियंताने आपला वाढदिवस साजरा केल्याचा लज्जास्पद प्रकार सोमवार दि २७ जुलै ला घडल्याचा प्रकार उघडकीस आला.

सध्या देशात कोरोना महामारी सुरू असून देशात सर्वात जास्त कोरोनाबधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहे.नागपुरातही कोरोनाचे जवळपास पाच हजार रुग्ण आहेत.अशातच शासकीय कार्यक्रमात महावितरणचे अधीक्षक अभियंत्याकडून आपला खाजगी वाढदिवस साजरा करीत असताना कुठल्याही शासकीय गाईड लाईन्सचा अवलंब मास्क व सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडविल्याचे चित्र दृष्टीक्षेपात पडले.

महत्वाची बाब अशी की,कुठल्याही शासकीय कार्यक्रमात कुणीही अधिकारी आपला खाजगी कार्यक्रम साजरा करू शकत नसतांना महावितरण चे अधीक्षक अभियंता यांनी आपला वाढदिवस साजरा करून शासकीय नियमांची पायमल्लीच केली आहे.अशा जवाबदार अधिकाऱ्यांकडून शासकीय नियमांची पायमल्ली झाल्याने त्यांचेवर कुणी कार्यवाही करेल का?हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच आहे.

उदघाटन कार्यक्रमातच केला वाढदिवस साजरा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3fa5yCH
via

No comments