संचारबंदी दरम्यान देवलापार पोलीसांची दारु माफियांवर धडक कार्यवाही
रामटेक– देशात कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारत सरकारने संचारबंदीच्या काळात पुर्णपणे दारुबंदी केली आहे . भारत सरकारच्या आदेशाला झुगारुन पिंडकापार येथिल सिताकसा डॅम येथे मोठया प्रमाणात दारु भटटी लावून विक्री होत असल्याची गुप्त बातमीदारे माहिती देवलापार पोलीसांना मीळताच देवलापार येथिल ठाणेदार प्रविण बोरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली केशव पुंजरवाड व पो . स्टे . स्टाफ याचे पथक नेमुन गोपीनीय बातमी दाराने दिलेल्या मीहीतीच्या ठिकाणी मौजा पिंडकापार येथिल सिताकसा डॅम परीसरात कार्यवाही करणेसाठी पोलीस रवाना झाले .
सदर पथकाने पिंडकापार येथिल सिताकसा डॅम शिवार येथे जाउन तेथील डॉमच्या किणा – याच्या परीसराची पाहणी केली असता त्या ठिकाणी २०प्लास्टिक चुमडया मध्ये , तसेच १० प्लासिटीक ड्रम मध्ये ३५ , ०० ली मोहाफुल रसायन सडवा व मोहाफुल गावठी दारु , ०५ रबरी टयुब मध्ये २५० ली . तसेच दारुभट्टीसाठी लागणारे साहित्य असा एकुण ७ , ७५ , 000 रु चा मुद्देमाल मोठया प्रमाणात अवैधरित्या मिळुन आला व सदर प्रकरणामध्ये पो . स्टे . अप . क्र . १०५ / २०२० कलम ६५ ( ई ) ( एफ ) , ( सी ) , ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्हयामध्ये २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले .
सदर कार्यवाही मा . राकेश ओला सा . पोलीस अधिक्षक नागा , मा . मोनिका राऊत अपर पो . अधिक्षक नागा , मा . नयन अलूरकर पा . उपविभागीय अधिकारी रामटेक विभाग , यांच्या मार्गदर्शनात सपोनि / प्रविण बोरकुटे ठाणेदार पो . स्टे . देवलापार , पोउपनि केशव पूंजरवाड , मपोउपनि लक्ष्मी घोडके , संदिप नागोस , मोरेश्वर नागोस , सचिन डायलकर ,गजानन जाधव , रमेश खरकटे यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि केशव पुंजरवाड हे करित आहे .
संचारबंदी दरम्यान देवलापार पोलीसांची दारु माफियांवर धडक कार्यवाही
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YC3xuu
via
No comments