तेरविचा खर्च न करता स्मशानभूमीत केले बोधोवृक्षाचे रोपट्याची लागवड
कामठी :-व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनाठायी खर्च न करता त्यातून समाजोपयोगी कार्य करता येऊ शकते हीच बाब कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कढोली गावातील माजी सरपंच रविभाऊ रंगारी यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली तर त्यांनी त्यांच्या बुद्धवासी झालेल्या काकाच्या मरणाची अस्थी पाण्यात विसर्जित न करता ती अस्थी स्मशानभूमीच्या जमिनीत पुरून त्यावर बोधिवृक्षाचे प्रतीक असलेले पिंपळाच्या झाडाचे रोपट्याची लागवड करून त्या झाडाला मोठे करून त्यातच बुद्धवासी झालेल्या काकाला स्मरण करावे असा उपक्रम राबवून समाजाला एक आदर्श असा संदेश दिला.
परवा कढोली गावचे माजी सरपंच रविभाऊ रंगारी चे काका व ऋषी रंगारी यांचे वडील केशवराव रंगारी यांचे अकस्मात दुःखद निधन झाले यानुसार त्यांना मुखांग्नी दिल्या नंतर विसर्जित करणारी अस्थी ही विसर्जित न करता व कोरोना संकटामुळे तसेही तेरविचा कार्यक्रम करणे शक्य होत नसल्याने या तेरविवर होणारा खर्च टळला त्यामुळे कुटुंबीय सदस्यांनी घेतलेल्या निर्णयातुन ,त्या अस्थी जमीनीत पुरून त्यावर 1 सुबक पिंपळ वृक्षांची लागवड केली ,त्या वृक्षांची जोपासना ,त्यांचं पिंपळ त्याचे वडील जाऊनही त्यांच्यात राहावे ही इच्छा बाळगली आणि त्यांच्या ह्या उपक्रम ने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत झाली तसेच हा खर्च गावातील सामाजिक कार्यावर खर्च करणार असल्याचे सांगण्यात आले या उपक्रमातून रंगारी कुटुंबीयनी समाजाला एक आदर्श असा सामाजिक बांधिलकी चा संदेश दिला.
याप्रसंगी ऋषी रंगारी, रवी रंगारी, सचिन रंगारी, रवींद्र, देविदास यासह कढोली ग्रा प सरपंच प्रांजल वाघ आदी उपस्थित होते
तेरविचा खर्च न करता स्मशानभूमीत केले बोधोवृक्षाचे रोपट्याची लागवड
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WnhWYB
via
No comments