त्या’ मृत्यु प्रकरणात वैद्यकीय समितीची चौकशी

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बजरंग पार्क रहिवासी 48 वर्षीय इसम हरिभाऊ लक्ष्मण नेवारे चा अतिसाराच्या आजाराने उपचार घेत असलेल्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 3 मे ला रात्री 12. 15 वाजता घडल्याने यावर संतापजनक असलेल्या मृतकाच्या नातेवाईकाच्या पुढाकारातुन रुग्ण कल्याण समिती चे अध्यक्ष डॉ महेश महाजन यांनी या मृत्यू प्रकरणात उपस्थित वैद्यकीय अधिकारी चा कर्तव्यातील कसुरसह हयगय पणा दिसुन येत असल्याने यासंदर्भात वैद्यकिय अधीक्षक डॉ धीरज चोखाद्रे व वैद्यकिय अधिकारी डॉ सुषमा नितनवरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पदावरून निलंबित करण्यात यावे अशी मागणी
तक्रार सार्वजनिक आरोग्य मंत्री व आरोग्य विभागाच्या वरिष्ठकडे केलेल्या तक्रारीवरून या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर यांनी चार वैद्यकिय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती या चौकशी समिती ने आज 12 मे ला कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हरिभाऊ नेवारे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून घेतली.या चौकशी अहवाला वरून पुढील कारवाहीचे चित्र स्पष्ट होईल.
या चौकशी समितीत रामटेक उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे, कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंबरीश मोहबे,सर्वोपचार रुग्णालय नागपूर चे अधीक्षक आर जी शास्त्रकार, वरिष्ठ लीपिक आर जी घोडमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी
त्या’ मृत्यु प्रकरणात वैद्यकीय समितीची चौकशी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3cuJEcW
via
No comments