ग्रीन क्रूड फाउंडेशनतर्फे गरजू लोकांना धान्य वाटप.
नागपूर: कोरोनामुळे रोजगार हिरावल्याने संकटात सापडलेल्या गरीब गरजू लोकांना ग्रीन क्रूड ॲन्ड बायोफ्यूयल फाउंडेशनतर्फे धान्य वाटप करण्यात आले. सोशल डिस्टेन्स पाळत नागरिकांनी धान्य घेताना फाउंडेशनचे आभार मानले.
केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ग्रीन क्रूड ॲन्ड बायोफ्यूयल फाउंडेशनने आज इंद्रप्रस्थनगरातील पन्नासे ले आऊट येथे गरीब गरजू लोकांना गहू, तांदूळ, डाळ आदी जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानूसार सोशल डिस्टेन्स, मास्क आदीचा वापर करीत फाउंडेशनचे अध्यक्ष संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, सचिव अजित पारसे, चारुदत्त बोकारे, फाउंडेशनचे युवा आघाडीचे प्रज्वल भोयर, हर्षवर्धन फूके, धाणू जुमळे, यश निकम, विक्रम ठाकरे, संद्या लांडगे, आल्हाद कातूरे यांनी नागरिकांना आवश्यक वस्तूचे वाटप केले. याशिवाय कोरोनापासून सावध राहण्याबाबत नागरिकांत जनजागृती करण्यात आली.
ग्रीन क्रूड फाउंडेशनतर्फे गरजू लोकांना धान्य वाटप.
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bv2znn
via
No comments