Breaking News

आरोग्‍य सुविधांसाठी आ. टेकचंद सावरकर यांनी दिला २५ लक्ष रु. आमदार निधी

Nagpur Today : Nagpur News

जिल्हाधिकाऱ्याना दिले पत्र
वैद्यकीय साहित्य खरेदी साठी मदत*


कामठी : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍य विषयक सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी आ. टेकचंद सावरकर यांनी त्‍यांच्‍या आमदार निधीतुन २५ लक्ष रुपयांचा निधी कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रा साठी प्रदान केला आहे. २५ लक्ष रुपयांचा निधी जिल्‍हाधिकारी नागपूर यांना प्रदान केला आहे.

कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजनांसाठी प्रामुख्‍याने आरोग्‍य विषयक सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व आमदार व खासदारांना त्‍यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतुन निधी उपलब्‍ध करण्‍याचे आवाहन केले आहे. सदर आवाहनानुसार आ. सावरकर यांनी त्‍यांच्‍या आमदार निधीतुन २५ लक्ष रु. निधी जिल्‍हा प्रशासनाला प्रदान केला.

अन्‍य लोकप्रतिनिधीनी देखील आपल्‍या स्‍थानिक विकास निधीतुन निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचे आवाहन आपण करणार असल्‍याचे आ. सावरकर यांनी म्‍हटले आहे.

संदीप कांबळे कामठी

आरोग्‍य सुविधांसाठी आ. टेकचंद सावरकर यांनी दिला २५ लक्ष रु. आमदार निधी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3aBkhVB
via

No comments