न्यू कैलास नगर मित्र मंडळा तर्फे गरजूंना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप
नागपूर : करोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूर कामगार गोर गरीब वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला न्यू कैलास नगर मित्र मंडळाने मदतीचा हात दिला.
न्यू कैलास नगर मित्र मंडळाने गरजू कुटुंबाची यादी तयार करून त्यांनी गरजू परप्रांतीय मजुरांना आणि निराधार महिलांना या किराणा किट्स चे वाटप करण्यात आले. या किटमध्ये ४ किलो तांदूळ, २ किलो गहू, १/२ किलो सोयाबिन तेल, १ किलो चणाडाळ, १ किलो मिठाचा पॅकेट, मिर्ची पावडर एक पॅकेट, हळद एक पॅकेट, या साहित्याचा समावेश आहे.आतापर्यंत मंडळा तर्फे १५० कुटुंबांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू कैलास नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष. श्रेयस कुंभारे, उपाध्यक्ष. प्रफुल्ल पेलणे, सचिव. ईशान चिकाटे, विपिन वागदे आमचे मार्गदर्शक मा. मनोजभाऊ गावंडे (नगरसेवक), मा.हर्षवर्धन कुंभारे यांचा सोबत देवाशिष पाटील, अभिजीत बुजाडे, प्रणय ढोबळे, ऋषभ मून यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
तसेच नागपुर शहरातील गरजू नागरिकांना सदर अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट लॉक डाऊन संपेपर्यंत वाटप चालू राहणार असल्याचे मंडळाने यावेळी सांगितले.
न्यू कैलास नगर मित्र मंडळा तर्फे गरजूंना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3aCOxyS
via
No comments