गुन्हेगारी पाश्वरभूमिसह राजकीय पदाधिकारी बनले विशेष पोलीस अधिकारी
खुफिया ने खानापूर्तीच्या भूमिकेत ‘अंधा बाटे रेवडी – फिर भी दे अपनो अपनो को’
कामठी :-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा भारतासह महाराष्ट्रात ही पोहोचला याच पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी सह जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तेव्हा या प्रकारणात नागरिकाना प्रतिबंध घालण्यात पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नोयंत्रणासाठी सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवसथा अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाचे सामूहिक घटक म्हणून काम करण्यासाठी पोलीस दलाला स्वेच्छेने मदत करण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशांनव्ये नागपूर शहर परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातून बिटनिहाय 5 कोव्हीड योद्धा निवडण्याचे आदेशीत करण्यात आले यानुसार परिसरातील बिट निहाय त्या कार्यक्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन एन एस एस , एन सी सी केडेट चे प्राध्यापक व अधिकारी, सिव्हिल डिफेन्स अधिकारी यासारखे गुन्हेगारी पाश्वरभुमी नसलेले नागरिकांची कोव्हीड योद्धा म्हणून निवडायचे होते तेव्हा संबंधित पोलिसांनी तेथील नगरसेवक , लोकप्रतिनिधो वा जागरूक नागरिकांशी संबंध गाठून निवड करणे अपेक्षित होते मात्र नवीन कामठी पोलीस स्टेशन चे खुफिया कर्मचारी मयूर बनसोड, ओमप्रकाश खंडाते यांनी स्वतःच्या तर्कशक्तीचा वापर करून कुणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या मनमर्जीने निवड केली यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत 29 कोविड योद्धा तर जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत 10 कोविड योद्धाची निवड करण्यात आली.यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने खुफिया कडून शोधलेल्या कोव्हीड योध्यात गुन्हेगारी पाश्वरभुमी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांची निवड केली व ही माहितो लपवून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केलि. त्यातच या खुफिया विभागाने ‘अंधा बाटे रेवडी -फिर भी दे अपनो अपनो को’अशी धृतराष्ट्र भूमिका बजावून खानापूर्ती केल्याचे दिसून येते.
यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतून निवड केलेल्या कोविड योद्धत भादवी कलम 307 चा गुन्हा दाखल असलेल्या सह , भाजप च्या काही राजकीय पदाधिकारी सह महाविद्यालयातील शिपाई व ग्रा प उपसरपंच च्या पतीला सुद्धा विशेष पोलीस अधिकारी म्हणून नोयुक्त केल्याची गावात चर्चा आहे .
एकीकडे या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभाग डोळ्यात तेल घालून पहारा घालत असल्याने जणू काही परमेश्वराची भूमिका साकारल्याने त्यांच्याबाबत नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे त्यातच अशा पक्षपाती कर्तव्य बाजावनाऱ्या पोलिसमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तेव्हा या संदर्भात डी सी पी निलोत्पल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत कोव्हीड योद्ध्याच्या निवडीत दिलेले निकषांवरच कोव्हीड योद्धाची निवड करण्यात यावी तसेच पोलीस खात्यात राहून खुफिया सारख्या जवाबदार विभागात काम करताना अशा प्रकारचा बेजबाबदार पणा वागणे हे काहो योग्य नाही तेव्हा अशा बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्यात यावी अशी मागणी सुज्ञान नागरीकाकडून होत आहे.
संदीप कांबळे कामठी
गुन्हेगारी पाश्वरभूमिसह राजकीय पदाधिकारी बनले विशेष पोलीस अधिकारी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2xJ9HxT
via
No comments