कामठी नगर परिषद कर्मचाऱयांनी काळ्या फिती लावून केले कामकाज सुरू
कामठी :-महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे या पाश्वरभूमीवर कामठी शहरात लॉकडाऊन सह संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू केलेला आहे त्यातच कामठी नगर परिषद मुख्याधिकारी , सफाई कर्मचारो तसेच नगर परोषद चा प्रत्येक कर्मचारी 14 फेब्रुवारी पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरातील प्रत्येक भागात अहोरात्र औषधी फवारणी, नव्याने आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करणे, शहरामध्ये गर्दीची ठिकाणे होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणे अशी कामे करीत आहेत असे असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या या सर्व नगर परिषद अधोकारी कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यात यावा या मागणोसाठी कामठी नगर परिषद कर्मचारी , संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने आज 27 एप्रिल ला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजाची सुरुवात केली.
राज्यातील इतर विभागा प्रमाणे ग्रामविकास विभाग, गृह विभाग , आरोग्य विभाग यांच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय विमा उतरविण्यात आला यानुसार नगर परिषद कर्मचाऱ्यांना विमा उतरविण्याबाबत आरोग्य सुविधा पुरविणे बाबत संघटनेच्या वतीने शासनाला विनंती करण्यात आली होतो परंतु त्याबाबत शासनाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही तेव्हा शासनाचे याकडे जातीने लक्ष वेधून घेत नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा लागू करून वैद्यकीय सेवा पुरविण्यात याव्या या मागणीसाठी आज कामठी नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजय जैस्वाल यांच्या नेतृत्वात नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी , पाणी पुरवठा तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करणे सुरुवात केले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय जैस्वाल, मसूद अख्तर, प्रदीप भोकरे, नरेश कलसे, विजय मेथीयां, धर्मेश जैस्वाल, पुंडलिक राऊत, रुपेश जैस्वाल, रंजित माटे, माधुरी घोडेस्वार, , अश्विनी पिल्ललारे आदी उपस्थित होते
कामठी नगर परिषद कर्मचाऱयांनी काळ्या फिती लावून केले कामकाज सुरू
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2KEpG2Q
via
No comments