शेत विहिरीचे विद्युतखांब पडुन नुकसान
विद्युत जोडणी कामात कंत्राटदा रांचा निष्काळजीपणा.
कन्हान : – शेतक-यांच्या शेतविहिरीवर थ्रीफेस विद्युत लाईन जोडणी कामात कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस वा-याने वारंवार विद्युत खांब पडुन शेतक-यांचे व शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गैरकारभार करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
तेलंगखेडी येथील शेतकरी जिवलग चव्हाण व पुरणदास तांडेकर यांच्या शेताच्या विहिरीवर १० महिन्या अगोदर जून २०१९ मध्ये विद्युत जोडणी करण्या त आली. यावेळी उभे करण्यात आलेले विद्युत खांब पाच फुटाऐवजी तीन ते साडेतीन फूट गड्डा खोल करून उभे करण्यात आले. गड्डयात सिमेंट, गिट्टीचा मसाला न टाकता मातीने विद्युत पोल जाम करण्यात आले. अत्यंत कमकुवत पणे उभे करण्यात आलेले विद्युत पोल सप्टेंबर २०१९ महिन्यात आलेल्या पाव सामुळे काही पडले तर काही वाकले.
या संदर्भात विद्युत विभाग नगरधन येथे तक्रार केल्याने डिसेंबर १९ मध्ये विद्युत पोल सरळ उभे करताना गड्डे खोल का केले नाही? गिट्टी, सिमेट वापरून विद्युत पोल जाम का करित नाही? अशी विचा रणा शेतक-यांने केली असता इस्टीमेंट मध्ये नाही असे उत्तर कंत्राटदाराच्या माणसांनी सांगितले. या विषयी नगरधन येथील अभियंत्यांस सांगितले असता, त्यांनी सुध्दा काम होऊ द्या नंतर पाहू असे मौखिक उत्तर देऊन गैरप्रकारांना बोळवण करीत पाठिंबा दिला.
शुक्रवारी (दि.२०) रात्री आलेल्या गारपीट पावसाने यांच विहिरीचे चार खांब जमिनीवर पडले तर पाच खांब वाकले. सुदैवाने कुठलिही जिवहानी झाली नाही. कंत्राटदाराने व्यवस्थित काम केले नसल्याने तसेच विद्युत अभियंत्याने गैरप्रकारांना वेळीच आळा घातला नसल्याने वारंवार विद्युत पोल पडून शेतक-यांचे व शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर विद्युत जोडणी प्रकरणाची चौकशी करून दोषी कंत्राटदार व संबधित अधिकार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी जिवलग चव्हाण व पुरणदास तांडेकर सह शेतक-यांनी केली आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री व वरिष्ठ अधिका-यांना निवेदन देण्यात येणार आहे.
शेत विहिरीचे विद्युतखांब पडुन नुकसान
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/33JUKXP
via
No comments